Posts

Showing posts from August, 2023

आई 💜

Image
ती नेहमी म्हणते "आई " म्हणत जा पण बाळकडू मिळालेल्या मम्मी शब्दापुढे आई म्हणणं राहूनच जातंय. आतापर्यंत इतक्या कवींनी आई बद्दल इतक सार लिहलं पण माझ्या छोट्याश्या मनात तिच्याबद्दल लिहण्याची हिम्मत होत नाही जिच्यामुळे हे विश्व् पाहतोय तिला शेवटच्या श्वासापर्यंत जपायचं आणि आहे ते आयुष्य तिच्या साथीत राहून शक्य होईल तितका आनंद द्यायचा यापेक्षा अजून काय लिहणे बाकी आई चं वर्णन संत महात्म्यापासून ते अनेक जणांनी केलेलं माहित असून सुद्धा ते पानांपुरत चं राहिलेलं आहे आजकालच्या जगात 40% लोक अगदी मनापासून त्याची जाणीव ठेवून आपापल्या पद्धतीने त्या माउलीला जपत असतात पण बाकी 60% लोकांना आपण तिच्यामुळे आत्ताचे आहोत याची जाणीव सुद्धा नसते. असो आई दिनाच्या माझ्या प्रिय आईला लाख भर शुभेच्छा 💜🤗 🙊आणि नेहमीसारखं चं happy mothers day mummy 😄🤝🏻 आज वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा post केलेली ही एक आठवण. 🤝🏻🤝🏻