Posts

हरवलेले क्षण.. 💜

Image
मी हरवलो त्या क्षणांवर  ह्रिदय आपले गुंफता  मिठीत माझ्या रात साजिरी  तुझेच गीत गाता  बहरलेल्या त्या फुलांवर  स्पर्श तुझे उमटता  भरून येती चंद्र चांदणे  सांज मनी स्मरता  मिटून डोळे त्या क्षणांची  गोड होई सांगता  पापण्याच्या अडून दिसे  आपल्या मिलनाची प्रतिमा                              - Divu💜                             

गंध ओले बावरे... 💜

Image
सावलीच्या अंधारी केस ओले  छेडिले  जवळी येता तुझ्या   मिठीत माझे क्षण रंगले  ओझरत्या पापण्यांचे हृदयी  माझ्या तुझे चांदणे  प्रीत उरली ओठावरली  स्वप्नी बहरे हे लाजणे  धुक्यातूनी चालताना स्पर्श तुझा  का स्मरे  जीवही माझा दव होई  गंध ओले बावरे                                    - Div💜

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

Image
आजकाल  चंद्राच्या प्रकाशात तिला पाहणं  खूप क्वचित झालंय..... चांदण्यांच्या गर्दीत रमून जायला  तारांगण ही धावून आलय. मग  आभाळही चित्रफिती घेत असावं  अन  पाण्यात आमचं  प्रतिबिंब दिसतंय  उजळून येतो ध्रुवताराही  आणि  शीतल छायेला पाझर फुटतंय.. मिठी आम्हाला कमीच पडते  पण सुंगंधात तिच्या मी  पुन्हा हरवतोय  दूर दूर ती जाते जशी... दूर दूर ती जाते जशी काळीज पुन्हा पुन्हा भरून येतंय 💜💜                              - Div💜

चंद्र सखा कुठे रमावा.....

Image
दुरही तुमच्या खळीत हरवता  प्रश्न मना कोणता पडावा......?  नजरेत भरून तुम्हास पाहता   चंद्र सखा कुठे रमावा......... वाऱ्यासह चाहूल तुमची  प्रिय सखी लागे स्पंदनी माझ्या गुंतती अवघे  स्मरूनी तुमचे धागे....... प्रेमास आस मनी आम्हा  नकळत अशी जागे. अंतरी आमच्या नाव हृदयी  शोभून तुमचे साजे |                         - Divu💜                         

मी हरवलो त्या क्षणांवर.. 💜🩷

Image
मी हरवलो त्या क्षणांवर  ह्रिदय आपले गुंफता  मिठीत माझ्या रात साजिरी  तुझेच गीत गाता  बहरलेल्या त्या फुलांवर  स्पर्श तुझे उमटता  भरून येती चंद्र चांदणे  सांज मनी स्मरता  मिटून डोळे त्या क्षणांची  गोड होई सांगता  पापण्याच्या अडून दिसे  आपल्या मिलनाची प्रतिमा                              - Divu💜

स्पंदनास प्रश्न पडले.... 🩷💜

Image
तुझ्यात हरवताना स्पंदनास प्रश्न पडले नक्की कशात हरवू......? हलकेच गालात तुझ्या हास्य उमलले मज कसा मी सावरू...... भिजलेल्या आभाळाने  बरसण्या आधी थेंब सुखाचे भरले होते चाहूल तुझी अशी लागता लागता मेघ स्वरांनी सजले होते त्या स्वरात मोहून जाताना ओढ तुझी लागली होती चिंब पावसात भिजताना मिठीत माझ्या तू रमली होती........                                - Divu💜

माणूस म्हणून जगताना..

Image
माणूस म्हणून जगताना...... आपल्या लहान वयापासून ते प्रौढ होईपर्यत  सगळेच अगदी धांदल, वाहत जाणार वागणं, कल्ला करणं, वैगरे वैगेरे.पण जसं जसं एक समज येतं जाते तसं तसं  त्याचं वागण एका विचारांती शिस्तबद्ध आणि  कणखर होत जातं. मग ना आधीचा तो राहात. किंवा राहण्यात आधीसारखी सर येतं नाही. समाजाप्रती असलेलं एक कार्य आपल्या  जगण्याचे आठ तास आणि त्याची जी असेल ती आवड जोपासून  तो निवांत चाललेला असतो. काही वेळा महाराजांचे पोवाडे चरित्र आणि  शिवबा राज जन्माला येतील का पुन्हा अशा विचारांनी स्वतःला  सावरण्याचा प्रयत्न करत असलेला तो  पूर्ण त्यांच्या विचारांतून एखादा तरी गुण उतरेल का हॊ आपल्यात  असं विचार करणारा असतो. कधी कधी आधीच्या अल्लड वागणुकीवरून  त्याच्या पाठी तो कितीही बदलला तरीसुद्धा  "तो तर असाच आहे" असे बोलणारे कमी भेटणार नाहीत. आपल्या महाराजांनी अशा दोनही प्रवृत्तीना  अगदी हळुवार पणे सांभाळलंय  एकतर एखाद्याला पूर्ण च कणखर बनवा  किंवा तो तसा नसेल तरी संस्कारांनी त्याच्यात बदल घडवून आणा. शेवटी जगताना माणसाकडून चुका ह...