स्पंदनास प्रश्न पडले.... 🩷💜

तुझ्यात हरवताना
स्पंदनास प्रश्न पडले
नक्की कशात हरवू......?
हलकेच गालात
तुझ्या हास्य उमलले
मज कसा मी सावरू......

भिजलेल्या आभाळाने 
बरसण्या आधी
थेंब सुखाचे भरले
होते
चाहूल तुझी अशी लागता
लागता
मेघ स्वरांनी सजले होते

त्या स्वरात मोहून
जाताना
ओढ तुझी लागली
होती
चिंब पावसात भिजताना
मिठीत माझ्या तू रमली होती........

                               - Divu💜

Comments

Popular posts from this blog

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺