अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺
जगदंब!
हे माय भवानी
हे जगतजननी जगदंबे
तुझ्याच कृपे व आशीर्वादाने दहा हत्तीच बळ
हातात घेऊन अफझल सारखा सरदार आमच्या महाराजांच्या हाताने तू मारलास
मग आता च इतकी शांत का तू आई....
राजगडाच्या त्या माची ला तुझं नाव आहे कारण
त्यात तुझं अस्तित्व आमच्या राजांनी जपलंय
इतक्या पवित्र आणि न्यायचं हक्काचं स्थान असलेल्या या
राजगडावर आपल्याच पैकी एका ताई ची हत्या होते
हा प्रसंग महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारच.
तिच्यावर आलेल्या प्रसंगामुळे माझ्या राजाचा राजगड सुद्धा तितकाच शहारला असेल जितकं आम्ही.
आजवर याच गडावर लेकी बाळी सुरक्षित हातात जपल्या गेल्या होत्या
पण दुर्भाग्य आपलं याच जागेला महाराजांच्या विचारांविरुद्ध गेलेल्या त्या औलादीमुळे अस्थिरता आलीय.
आजवर अनेक जण या च जागी आपलं दुःख सुख घेऊन येतात
महाराजांच्या नावाचा जयजयकार करतात
पण परवाच्या झालेल्या त्या प्रसंगाने
अगदी गहिवरून जायला झालंय
सगळे अगदी एकूण एक महाराजांचे गाणे ऐकू येतात
पण अर्थ च उमगत नाहीये
शंभु शंकराच नव्ह राजगड गाव रं.....
शंभु शंकराच गाव
इतक्या झुंजार जागेत आणि काय ते म्हणतात कस जगावं हे शिकायचं असेल तर राजगडावर जावं
अशा जागी आपल्याच पैकी एका ताई ची हत्या होतेच कशी..?
इतका तोल का जावा की राजांचा इतिहासाला त्या गनिमाच्या
औलादीने डाग लावावा?
ज्या जागेतून आमच्या हिंदवी स्वराज्याची पायाभरणी झाली त्या जागेत आज कोणता पायंडा पाडला जातोय..?
आजवर फकत मनात येतं होत
पण आत्ता कळकळीने वाटू लागलाय
पोलीस यंत्रणे प्रमाणेच
दुर्गारक्षक नावाने सुद्धा तुकडी काढावी सरकारने
माणसाच्या वृत्ती नुसार वागण्याच्या पद्धती ही बदलून गेल्या आहेत अशा त काय हे
महाराजांचे विचार स्मरणात घेणार....
किल्ले संवर्धन करणारे काही हौशी तरुण मंडळी त्यांचे
प्रयत्न ठेवतायत खरं... पण कितपत त्याचा उपयोग समाजाला होतोय??
पुन्हा हवं ते लोक करतच आहेत अगदी सर्रास पणे.
काय तर आम्ही चाकर शिवबाचे होणार... कसे?
श्वासात राज अन ध्यासात राज... कसे?
डोळे मिटून घेत अन तुझ्या पाशी म्हणजे च माझ्या राजांपाशी येतं.... बोला ना कसे??
आज महाराज अस्तित्वात असते आपल्या सोबत तर काय केलं असतं त्यांनी याचा एकदा विचार करून पहा
आपण सर्व पिढी कुठे आणि कशा पद्धतीने जगत
असतो याचा विचार करा
Practicle जगात वावरताना आपण कोणामुळे आहोत त्यांचे विचार काय होते याचा विचार बाळगा म्हणजे असं विक्षिप्त वागण्याचा विचार ही येणार नाही मनात.
असो
राजगडाशी झालेल्या या जवळीकी मुळे
त्या ताई च्या जाण्याने जीव गहिवरून आला
पण पुन्हा अशा घटना होऊच नये याची
पावलं आपण कुठून उचलणार आहोत.....?
त्या ताई च्या आत्म्यास शांती लाभो
जय भवानी जय शिवराय!
- दिवेश पाटील
Comments
Post a Comment