स्वरसावली - भाग 2
....... चला अशा पद्धतीने एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. एकंदरीत भैरव रागातील जागो मोहन प्यारे ऐकुन बुवांनी माझ्यावर हातोडी मारणं चालू केल. एखादा मूर्तिकार जसं दगडावर सतत ठोकून त्यातून सुंदर प्रतिकृती घडवतो आणि ते बघून जसं मन प्रसन्न होत. तसच अगदी माझ्या स्वरांना आकार द्यायला त्यांनी सुरुवात केली. सोबत तेव्हा तानपुऱ्याच महत्व समजावून दिल. या आधी जे कधीच हातात नव्हतं, ते हाती घ्यायला भीतीच वाटायची. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो........ तानपुरा म्हणजे अगदी नादब्रम्ह अनुभवाव असं तंतुवाद्य. जे कळलं कि त्याची ओढ लागते. शिवाय ज्याला त्याच महत्व कळालं आणि तंतोतंत सुरात लावता आला कि त्याच संगीत सुरेल झालंच म्हणून समजा 💜. तर.......... व्हायचं असं. आम्ही आपले नवीन, त्यामुळे तानपुरा लावताना त्याचा तारा काही वेळा तुटत असत. मग बुवांनी त्याच ही science सांगितलं.. असाच रोजचा दिनक्रम असायचा. कधी तारा तुटायच्या ...