स्वरसावली - भाग 1

सावली बनू आम्ही 
 स्वरांची 
तान छेडू आम्ही 
ह्रिदयांची 
मन गुंफू आम्ही 
जनांची 
ओंजळ अशी 
सात स्वरांनी भरू आम्ही 
रसिकांची............. 
    खूप वर्षांपासून भटकत असलेलो आम्ही 
 शेवटी येऊन ठेपलो त्या गुरुचरणाशी 
 त्यात सुख होत 
 समाधान होत 
 संगीतमय दुनियेचा समुद्रच जणू काही 
 पार करायचंय ही भावना होती 
....... 
तो उत्साह नवीन नवीन
 ताज्या दमाचा......... 
ज्यात आम्ही काही मंडळी प्रवास करू पाहत होतो 

पहिला साथीदार म्हणजे केदार 
शुद्ध मनाचा... जे आहे ते सडेतोड 
एक घाव दोन तुकडे 
संगीताबद्दल फारच निष्ठा असलेला 
आणि सोबतीला याज्ञीकि 
त्यात नवीन लग्न 
म्हणजे संसार सुखाचा होईल निर्धार 
नामाचा गजर सर्वकाळ 😄😄

अशी तालीम 4 5 महिने चालू असताना 
झाली माझी entry.... 
बरं का 
मी आलेलो वेगळ्याच भूमिकेत 
आधीच्या गुरुं कडून फारस ज्ञान 
न प्राप्त झालेलं मडकं 
एकदम कच्च 
पण बुवांनी बघूनच ओळखल
काय रे 
आज काही गुरुपौर्णिमा नाही..... आमच्याकडे कस काय येणं केल 😄
तसाच काही सुचेनासं झालेल्या परिस्थितीत 
मी आई कडे पाहिलं 
तिनेच पुढच काय ते सावरलं... 
अहो बुवा तोच हट्ट करत होता तुमच्याकडे येण्याचं 
....झालं मग 
एक छोटी viva झाली 
गाणं ऐकून buva म्हणाले.... हं सुरेल आहे 
काय मग येणार का आमच्याकडे 
मी हं करत मान डोलावली 
खरंतर आनंद एकच वेळी दोन्ही गोष्टी साध्य 
झाल्या याचा झालेला.... 
काही वर्षांपूर्वीच जुन दुखणं 
संपून जाईल हा ही उद्देश साध्य होणार होता 
.....

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺