गोष्ट एका स्वरात हरवलेल्या मुलाची 💜
........... गोष्ट एका स्वरात हरवलेल्या मुलाची पहाटे च अगदी सा मधे हरवलेला तो पुन्हा एकदा स्वतःत गुंतला होता. त्या गुंतलेल्या आयुष्यात निरामय सकाळ व्हावी अशी एक सखी नकळत त्याला सुखावून गेली. शंभूमय विचारात मग्न झालेल्या मनात एक काहूर उठलं तिच्या असण्याचं.... जश्या शिवछत्रपतीं शंभु ना येसू राणीसाहेब तश्या प्रकारे मनात ती अलगद भासू लागली. किनाऱ्यालगतच्या लाटावर जसे फेसळालेलं पाणी डोळ्यादेखत वाळूत विरून जाव तस त्याचा मनात हुरहूर तिच्या असण्याने होऊन गेलं आणि आनंदाच्या लाटान मधे तो पुरता भिजून गेला. मग पुन्हा उभारलेल्या स्वरात नादब्रम्ह त्याला अलगद खेचून सांगू पाहत होत अन स्वरांच्या ऊबदार सावली मधे त्याला मिठीत घेऊ पाहत होत पण त्या सावलीत आश्रित होताना ती पुन्हा एकदा भासली आयुष्याच्या वाटेवर एक नवीन घडी समे सारखी ठाकली........... - Divu💜