आमच्या हृदयातील राणीसाहेब..........?

सह्याद्रीच्या रांगेत एकटाच बसलेलो
मी
अचानक एका प्रश्नात हरवून गेलो.
प्रश्न ही विचार करत असावेत की हयाच उत्तर आम्हाला ही
मिळालं नाही आजवर
तर ही हिरवी गर्द पसरलेली शाल एखादी गुज करेल
का?.....
शंभु महाराज तुझ्याच छायेत वाढलेले
मातीतल्या सुगंधा प्रमाणे प्रत्येक बाबतीत मना मनात
दरवळणारे
आणि दैवी कवित्व प्राप्त झालेल्या
विचारानीं सखी राज्ञी जयती याचा
अविष्कार समोर आणून दिला.
त्याच विचारात हरवलेला मी
माझ्या आयुष्यातील सखी चा शोध घेऊ पाहत
होतो.
आणि अचानक समोर आलेली ती
आमच्या हृदयातील राणीसाहेब असाव्यात का??
ह्यचा विचार करू लागलो.
तळपत्या सूर्याप्रमाणे माझ्या राजाच अस्तित्व त्याची तोड
आम्हा कोणाला कुठे.. पण
त्त्यांच्या विचारांनी पुढे जाऊ पाहत असलेलो मी 
पुन्हा एकदा या गुंत्यात येऊन सापडलो...........

                                - Divu💜


Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺