हिऱ्यासम हास्य स्मरे 💜
स्वप्न भासे अंतरीचे
सुखही झाले बावरे
भिजूनी क्षण ओलावले ह्रिदयी
नयनी तुझ्या मी सावरे |
आस तुझी लागता अशी
हास्य पुरते गहिवरे
सप्तसूरांनी मिठीत घेता
अश्रुंनाही कंप भरे ||
थेंबही व्हावे पुरते खुळे
मिटूनी डोळे तुच दिसता
हिऱ्यासम हास्य स्मरे |||
-Divu💜
Comments
Post a Comment