Popular posts from this blog
तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜
आजकाल चंद्राच्या प्रकाशात तिला पाहणं खूप क्वचित झालंय..... चांदण्यांच्या गर्दीत रमून जायला तारांगण ही धावून आलय. मग आभाळही चित्रफिती घेत असावं अन पाण्यात आमचं प्रतिबिंब दिसतंय उजळून येतो ध्रुवताराही आणि शीतल छायेला पाझर फुटतंय.. मिठी आम्हाला कमीच पडते पण सुंगंधात तिच्या मी पुन्हा हरवतोय दूर दूर ती जाते जशी... दूर दूर ती जाते जशी काळीज पुन्हा पुन्हा भरून येतंय 💜💜 - Div💜
अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺
जगदंब! हे माय भवानी हे जगतजननी जगदंबे तुझ्याच कृपे व आशीर्वादाने दहा हत्तीच बळ हातात घेऊन अफझल सारखा सरदार आमच्या महाराजांच्या हाताने तू मारलास मग आता च इतकी शांत का तू आई.... राजगडाच्या त्या माची ला तुझं नाव आहे कारण त्यात तुझं अस्तित्व आमच्या राजांनी जपलंय इतक्या पवित्र आणि न्यायचं हक्काचं स्थान असलेल्या या राजगडावर आपल्याच पैकी एका ताई ची हत्या होते हा प्रसंग महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारच. तिच्यावर आलेल्या प्रसंगामुळे माझ्या राजाचा राजगड सुद्धा तितकाच शहारला असेल जितकं आम्ही. आजवर याच गडावर लेकी बाळी सुरक्षित हातात जपल्या गेल्या होत्या पण दुर्भाग्य आपलं याच जागेला महाराजांच्या विचारांविरुद्ध गेलेल्या त्या औलादीमुळे अस्थिरता आलीय. आजवर अनेक जण या च जागी आपलं दुःख सुख घेऊन येतात महाराजांच्या नावाचा जयजयकार करतात पण परवाच्या झालेल्या त्या प्रसंगाने अगदी गहिवरून जायला झालंय सगळे अगदी एकूण एक महाराजांचे गाणे ऐकू येतात पण अर्थ च उमगत नाहीये शंभु शंकराच नव्ह राजगड गाव रं..... शंभु शंकराच गाव इतक्या झुंजार जागेत आणि काय ते म्हणतात कस जगावं हे शिकायचं असेल तर राजग...
Comments
Post a Comment