माणूस म्हणून जगताना..

माणूस म्हणून जगताना......
आपल्या लहान वयापासून ते प्रौढ होईपर्यत 
सगळेच अगदी धांदल, वाहत जाणार वागणं, कल्ला करणं,
वैगरे वैगेरे.पण जसं जसं एक समज येतं जाते तसं तसं 
त्याचं वागण एका विचारांती शिस्तबद्ध आणि 
कणखर होत जातं.
मग ना आधीचा तो राहात.
किंवा राहण्यात आधीसारखी सर येतं नाही.
समाजाप्रती असलेलं एक कार्य आपल्या 
जगण्याचे आठ तास आणि त्याची जी असेल ती आवड जोपासून 
तो निवांत चाललेला असतो.
काही वेळा महाराजांचे पोवाडे चरित्र आणि 
शिवबा राज जन्माला येतील का पुन्हा अशा विचारांनी स्वतःला 
सावरण्याचा प्रयत्न करत असलेला तो 
पूर्ण त्यांच्या विचारांतून एखादा तरी गुण उतरेल का हॊ आपल्यात 
असं विचार करणारा असतो.
कधी कधी आधीच्या अल्लड वागणुकीवरून 
त्याच्या पाठी तो कितीही बदलला तरीसुद्धा 
"तो तर असाच आहे" असे बोलणारे कमी भेटणार नाहीत.
आपल्या महाराजांनी अशा दोनही प्रवृत्तीना 
अगदी हळुवार पणे सांभाळलंय 
एकतर एखाद्याला पूर्ण च कणखर बनवा 
किंवा तो तसा नसेल तरी संस्कारांनी त्याच्यात बदल घडवून आणा.
शेवटी जगताना माणसाकडून चुका होत असतात.
पण माणूस म्हणून जगताना चुकांवर पडदा पाडला 
आणि स्वतः
 जुनी नाही पण आताच्या पुण्याईवर 
बघा किती स्वताची ढाल करून जगता येतं....
जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो 
तर सामान्य माणसाचा नक्कीच 
जगण्यात बदल होऊ शकतो....
Div💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺