स्वरसावली - भाग 2

....... 
चला अशा पद्धतीने एका नव्या प्रवासाला 
सुरुवात झाली. 
एकंदरीत भैरव रागातील 
जागो मोहन प्यारे ऐकुन बुवांनी 
माझ्यावर हातोडी मारणं चालू केल. 
एखादा मूर्तिकार जसं दगडावर 
सतत ठोकून त्यातून सुंदर प्रतिकृती 
घडवतो आणि ते बघून 
जसं मन प्रसन्न होत. 
तसच अगदी माझ्या स्वरांना आकार द्यायला त्यांनी 
सुरुवात केली. 
सोबत तेव्हा तानपुऱ्याच महत्व समजावून दिल. 
या आधी जे कधीच हातात नव्हतं, ते 
हाती घ्यायला भीतीच वाटायची. 
विषय निघालाच आहे म्हणून सांगतो........ 
तानपुरा म्हणजे अगदी नादब्रम्ह 
अनुभवाव असं तंतुवाद्य. 
जे कळलं कि त्याची ओढ लागते. शिवाय ज्याला 
त्याच महत्व कळालं आणि तंतोतंत सुरात लावता आला 
कि त्याच संगीत सुरेल झालंच म्हणून समजा 💜. 
तर.......... 
व्हायचं असं.
आम्ही आपले नवीन, त्यामुळे तानपुरा 
लावताना त्याचा तारा काही वेळा तुटत असत. 
मग बुवांनी त्याच ही science सांगितलं.. 
असाच रोजचा दिनक्रम असायचा. कधी तारा तुटायच्या 
कधी सुरेल तर कधी चढ्या. 
त्यात काही शिकवण्या फक्त आणि फक्त... तानपुराच 
म्हणजे तो जुळवायचा.
नुसता जुळवायचा नाही बरं का.......... 
😄😄इथे खरा कस आहे, 
म्हणजे एकदा का तानपुरा जुळला कि 
दुसऱ्या क्षणात त्याचा सगळ्या खुंटी 
ढिल्या करायच्या. आणि हेच 50 वेळा चक्र 
चालू. 
थोडक्यात काय अशा पद्धतीत बुवांनी आमच्या स्वरांचा आणि कानांचा पाया रचून दिला. 
आताही अगदीच तंतोतंत लागेल याची शाश्वती नसते
पण तानपुऱ्याची ओढ आत्ता काही केल्या 
सुटत नाही. 
तसंच तानपुऱ्याचा अगदी जवळचा 
साथीदार. 
(डग्गा)
याला अवास्तव महत्व आहे 
म्हणालात तरी हरकत नाही💯💯
तालाच्या बाबतीत अगदीच वाकडं होत आमचं 
खास करून मी आणि शशिकांत. 
तेव्हा गाताना ताल धरून कस गायच 
याबद्दल थोडं समजावून दिल बुवांनी.
तबल्यासोबत असतो डग्गा माहित होत. 
पण डग्गा घेऊन रियाझ करणं फारच कष्टाचं काम.. 
इतकं करूनही माझा काही ताल सुधारत नव्हता 
शेवटी बुवांनी एक दिवस 
त्यांचा जुना डग्गा वाढदिवसाची भेट म्हणून मला दिला. 
म्हणाले यावर काम करा आणि गाणं तालात चुकू नका. 
असं म्हणत खूपच हसत होते........ 😄
.....................


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺