बाप्पा 2023

अशी ही मंगलमूर्ती आज आमच्या घरी आली.....
आल्या आल्या च आपल्या अखंड विश्वाच्या अस्तित्वाची
एक सुंदर अशी झलक तिने दाखवून दिली.
या विश्वरूपी कणा कणांमध्ये आपल्या डोळ्यांना न दिसणार त्या बाप्पा च रूप अगदी असं समोर येऊन ठाकल.
वर्षभर समोर आलेली सर्व सुख दुःख अगदी काही क्षणात
त्याच्या मोहक रूपात हरवून गेले
प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर पासून सुरु झालेली
त्याच्या प्रत्येक अस्तित्वाची जाणीव आम्हाला सुखावून जात होती
संगीताच्या सुरांमध्ये रमून गेलेला आपला बाप्पा
त्याच्या चारही हातानी सुख आणि समृद्धीचा
आशीर्वाद देत असावा
मध्यभागी ॐ कार आणि त्यातून उलगडणारी संपूर्ण
विश्वाची व्याख्या सहजरीत्या भासू लागली
 डोक्यावर असणार भरजरी मुकुट आणि एकदंताय
हसरं रूप त्याच्या अधिक जास्त जवळ ओढू लागलं होत.
दीड दिवसाच्या साथीला आलेला बाप्पा आमच्या ओढीने
पावणे दोन दिवस आशीर्वाद द्यायला थांबला
अंधारलेल्या आकाशगंगेत आम्हाला डोळे पाणावून टाकणार
रूप त्याने दाखवलं
तसेच जाता जाता सुख आणि समाधानाची व्याख्या
अगदी स्मितहास्याने तो
आम्हाला समजावून गेला
असा आमचा या वर्षीचा लाडका गणपती बाप्पा
तुझा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहो 😊💜
Div............ 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺