फेसाळलेल्या लाटेला क्षितिजापार तो शोधू पाही.......

क्षितिजावरील आभाळासवे

लाटांच्या आवाजात रमला तो 

अन

गडद रातीच्या अंधारी उर जीवाचा

भरला जो .....


भिरभीरणाऱ्या वाऱ्यासवे

मिटले डोळे अलगद त्याने 

आठवणी ही धुक्यात भिजल्या

 हाक ती ऐकू येई काने ......


गुज झाले दर्यामनाशी

मिठीत उरले प्रश्न काही....

फेसाळलेल्या लाटेला क्षितिजापार तो

शोधू पाही.......


- Div💜

Comments

Popular posts from this blog

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺